उद्धव गटाचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन

उद्धव गटाचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात शिवसेना आणि उद्धव गटात जोरदार हाणामारी झाली आहे. शिवसेनेकडून उद्धव गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिलांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन त्यांची भेट घेतली. रोशनी शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि शिवसैनिक पाठीशी असल्याचा धीर रोशनी यांना दिला. या प्रकरणामुळे ठाण्यात सध्या कायदा सुव्यवस्था प्रचंड बिघडलेली आहे. पोलीस यंत्रणेचा अजिबातच वचक राहिलेला नाहीये. याच पार्श्वभूमीवर उद्धव गटाच्यावतीने बुधवारी बिनकामाच्या पोलीस आयुक्तांविरोधात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
बुधवारी उद्धव गटाचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन झाले. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हेदेखील सामील झाले. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते, कार्यकर्तेदेखील मोर्च्यात सामील झाले.
रोशनी शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट केल्याने शिंदेंच्या महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. रोशनी शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांन पत्रकार परिषद घेत राज्यसरकारवर टीका केली. बिनकामी पोलीस आयुक्तांचं निलंबन करा किंवा त्यांची बदली करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version