दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त, पाक लष्करासह 20 दहशतवाद्यी ठार

दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त, पाक लष्करासह 20 दहशतवाद्यी ठार

काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तान लष्कराने अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झाले तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. पाकिस्तान लष्कराने भारतीय चौक्यांसह सीमेलगतच्या गावांना लक्ष्य केले.

नेमकं काय घडलं ?

दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरमधील सीमेलगतच्या तंगधार सेक्टरमध्ये रविवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.

शस्त्रसंधी उधळून लावत पाकिस्तानने गोळीबार सुरु केला.

त्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं.

मात्र प्रत्युत्तर देताना 2 जवान शहीद झाले आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारानंतर घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने हल्ला केला.

दहशतवादी तळ उदध्वस्त करण्यासाठी उखळी तोफाचा वापर करण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत नीलम व्हॅलीतील 4 दहशतवादी कॅम्प उदध्वस्त केले आहेत.

भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या 4 ते 5 सैनिकांसह 20 ते 22 दहशतवादी ठार झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version