देशात सर्वत्र रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा झाला असून अज्ञातांनी पोलिसांच्या गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर संभाजीनगरमध्ये शांततेचे वातावरण आहे.
छत्रपती संभाजी नगर शहरातील किराडपुरा परिसरात दोन गटात मोठा वाद निर्माण झाला होता. या वादातून झालेल्या दगडफेकीत पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या गाड्यांसहित ९ गाड्या जाळण्यात आल्या. दगडफेक रोखण्यासाठी अश्रूधुराचा वापर करून गर्दी पांगवली. रात्री साडे अकराच्या दरम्यान निर्माण झालेला वाद आणि बराच वेळ असलेली अशांतता पाहता पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
संभाजीनंगरमधील किराडपुरा भागात राम मंदिर आहे. रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. यावेळी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, दोन गटांमध्ये वाद झाला. दोन्ही गटांकडून आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. दगडफेक झाली. तर, अज्ञातांनकडून जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असता आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तसेच, सर्वपक्षीय नेत्यांनीही शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.