पार्किंगच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. हाणामारीचा प्रकार शनिवारी रात्री घडला असून या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.
डोंबिवलीतील पाथर्ली परिसरात ही घटना घडली. या भागात राहणारे रिक्षाचालक नितेश चाफळे हे मित्रांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायला चालले होते. हॉटेलसमोर रिक्षा लावताना एका बाईकस्वाराशी त्यांचा वाद झाला.
या वादातून बाईकस्वाराने त्याच्या मित्रांना बोलावून घेत रिक्षाचालक नितेश चाफळे याला बेदम मारहाण करत त्याच्या मांडीवर चाकूने वार केले. त्यांच्या हॉटेल कर्मचारी आणि पोलीस असलेल्या दोन मित्रांनाही यावेळी मारहाण करण्यात आली आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरीदेखील अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.