संसद प्रांगणात बारा सांप्रदायिक प्रार्थना सभा

संसद प्रांगणात बारा सांप्रदायिक प्रार्थना सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. नवीन इमारतीचे उद्घाटन वैदिक विधी व सर्वधर्म प्रार्थनेने करण्यात आले. यावेळी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. नवीन संसदेत सर्वधर्म प्रार्थना सभेत अनेक धर्मांच्या धर्मगुरुंनी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी येथे ‘सेंगोल’ची स्थापना केली. यावेळी पंतप्रधानांसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. सर्वधर्म प्रार्थनेत गुरु आणि विविध धर्मातील लोकांनी पूजा केली. हिंदू,बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारशी, मुस्लिम, शीख यासह अनेक धर्मांच्या धर्मगुरुंनी सर्वधर्मीय प्रार्थनेत प्रार्थना केली. सर्वधर्म समभाव याचे अचूक उदाहरण पंतप्रधानांनी उभे केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version