‘उद्धव, राऊतांची चौकशी करा’

‘उद्धव, राऊतांची चौकशी करा’

मुंबई, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करुन त्यांची चौकशी करावी. ही मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी केली आहे. केंद्र सरकारकडे त्यांनी ही मागणी केली आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनामुळे बाबरचा वंशज असलेल्या संजय राऊतला पोटशूळ उठला आहे. यामुळे राम मंदिराचे उद्घाटन जवळ आल्यावर राम भक्तांवर दहशतवादी हल्ला होईल, असे संजय राऊत बोलत असल्याचे तुषार भोसले म्हणाले.

याआधी राम मंदिर उद्घाटनावेळी हल्ला होऊ शकतो, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली. मोदी विरोधकांच्या बैठकीत राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा होणार, असेही संजय राऊत म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version