Donald Trump: ‘मी आठ युद्धे थांबवली; पंतप्रधान मला म्हणाले की तुम्ही दखल घेतली नसती तर…’; भारत-पाकिस्तान युद्धावर ट्रम्प पुन्हा बरळले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेट ऑफ द युनियन भाषणात आक्रमक परराष्ट्र धोरण, इराणविरोधी भूमिका आणि भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा करत जागतिक स्तरावर चर्चा निर्माण केली आहे.
Donald Trump: ‘मी आठ युद्धे थांबवली; पंतप्रधान मला म्हणाले की तुम्ही दखल घेतली नसती तर…’; भारत-पाकिस्तान युद्धावर ट्रम्प पुन्हा बरळले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ (State of the Union Address) भाषणादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण आणि वादग्रस्त विधानं करत जागतिक राजकारणात पुन्हा चर्चा निर्माण केली आहे. या भाषणादरम्यान त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा सर्वात दीर्घ स्टेट ऑफ द युनियन भाषणाचा विक्रमही मोडल्याचे सांगितले जात आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी “अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे” असा दावा करत देश इतिहासातील सर्वात मजबूत टप्प्यावर असल्याचे म्हटले.

ट्रम्प यांनी टॅरिफ धोरणावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यापार करारातून माघार घेण्याचा विचार करणाऱ्या देशांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. अमेरिकेच्या हितांविरोधात कोणतीही भूमिका स्वीकारली जाणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. जागतिक व्यापार आणि सुरक्षा धोरणात अमेरिका आक्रमक भूमिका कायम ठेवणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

भाषणादरम्यान ट्रम्प यांनी इराणविषयी कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित केली. “इराणला कधीही अण्वस्त्र मिळू देणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगताना त्यांनी इराणला जगातील दहशतवादाला पाठिंबा देणारा प्रमुख देश असल्याचा आरोप केला. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका प्रथम राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले. सध्या अमेरिकेच्या पुढील पावलाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर दुहेरी संकटाची चाहूल; पुढील 24 तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांत विजांसह मुसळधार सरींचा इशारा

याच भाषणात ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यात अमेरिकेची भूमिका असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वतः त्यांना हस्तक्षेप नसता तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती असे म्हटले. मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या चार दिवसांच्या भारत-पाकिस्तान लष्करी तणावासह एकूण आठ युद्धे रोखल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला.

भाषणात ट्रम्प यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांना सांगितले होते की जर अमेरिकेने हस्तक्षेप केला नसता तर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षामुळे तब्बल साडेतीन कोटी लोकांचा जीव धोक्यात आला असता. या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

ट्रम्प यांनी उल्लेख केलेल्या संघर्षांमध्ये कंबोडिया-थायलंड, भारत-पाकिस्तान, इस्रायल-इराण, इजिप्त-इथिओपिया, आर्मेनिया-अझरबैजान, काँगो-रवांडा, सर्बिया-कोसोवो तसेच इस्रायल-हमास संघर्षांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, या दाव्यांबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून अनेक विश्लेषकांनी त्यांच्या विधानांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दीड तासांहून अधिक काळ चाललेल्या या भाषणातून ट्रम्प प्रशासनाची आक्रमक परराष्ट्र नीती, व्यापार धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील कठोर भूमिका पुन्हा स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे. आगामी काळात अमेरिका-इराण संबंध, जागतिक व्यापार समीकरणे आणि दक्षिण आशियातील राजनैतिक घडामोडींवर या वक्तव्यांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: IDFC Bank Fraud: ‘हर्षद मेहता’चा आदर्श घेत डाव रचला; पण 'ती' एक चूक ठरली गेमचेंजर, IDFC बँक घोटाळ्याचा पर्दाफाश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version