रांगोळीच्या माध्यमातून भारतरत्न स्व. लतादीदींना आदरांजली

रांगोळीच्या माध्यमातून भारतरत्न स्व. लतादीदींना आदरांजली

भारतीय संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांना जळगावात अनोखी आदरांजली वाहण्यात आली आहे. जळगावच्या ओजस्विनी कला महाविद्यालयाने ५०० किलो रांगोळीतून साकारलेल्या प्रतिकृतीच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.

ओजस्विनी कला महाविद्यालयाने रांगोळीच्या माध्यमातून लता दीदींना आदरांजली वाहिली आहे. या भव्य रांगोळीत पांढरा आणि काळ्या रंगाचा वापर केला आहे. तर लतादीदी भारताचे भूषण असल्यामुळे या रांगोळीमध्ये तिंरगा ध्वजदेखील काढण्यात आला आहे. ओजस्विनी कला महाविद्यालयातील ५ शिक्षक आणि विद्यार्थी यांनी २४ तासांच्या प्रयत्नांनंतर लता दीदींची रांगोळी साकारली आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ९३व्या वर्षी लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आज नाशिकच्या रामकुंडात लता दीदींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. हृदयनाथ मंगेशकर यांचे पुत्र आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते लती दीदींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version