मुंबई : महाराष्ट्रात मागील 5 वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मायबाप मतदार राजानं विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं. 23 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांचे मतदानोत्तर अंदाज समोर आले आहेत. बहुतांश अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, असे चित्र निर्माण झाले असले तरी महायुतीचे यश अटीतटीचे आहे. मविआच्या जागा वाढल्याचा अंदाज आहे. निकालाच्या अंदाजात भाजपा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरताना दिसत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.