राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने दिली आहे. अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेला बिगरशेती जागेचा परवाना फसवणुकीने घेण्यात आल्यामुळे हा परवाना रद्द करण्यात आला आहे. परबांचा परवाना रद्द केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने लोकायुक्तांपुढे सादर केले. या प्रतिज्ञापत्रात रिसॉर्ट बेकायदेशीर तसेच जमिनीचा परवाना बेकायदेशीर असल्याचेही सांगितले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी लोकायुक्तांपुढे तक्रार दाखल केली होती. किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एन. कानडे यांच्यासमोर या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी झाली. त्यावेळी अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महसूल आणि वनखात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी लोकायुक्तांसमोर दिली. अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेला बिगरशेती जागेचा परवाना फसवणुकीने घेण्यात आला असल्याचे करीर यांनी सांगितले. त्यामुळे बेकायदेशीर रिसॉर्टचे बांधकाम आणि सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचे करीर यांनी सांगितले.
ठाकरे सरकार चे मंत्री अनिल परबचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे व त्याचा बिनशेती परवाना फसवणुकीने, फॉर्जरी करून घेण्यात आला होता. तो आत्ता रद्द करण्यात आला आहे आहे असे एफिडेविट महाराष्ट्र शासनाने काल लोकायुक्त यांचा कडील सुनावणीत दाखल केले सांगीतले@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/TcTUVIP1T0 — Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 8, 2021
अनिल परब यांनी दापोलीत बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महसूल खात्यांनी लोकायुक्तांसमोर दिल्यामुळे आता दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.