“स्टंटसाठी जीवाशी खेळ! ट्रॅक्टर चालकाचा धोकादायक स्टंट, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू”

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे स्टंट करत ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका व्यक्तीमुळे भयावह अपघात घडला. स्टंट करून ‘रील’ बनवण्यात व्यस्त असलेल्या ट्रॅक्टर चालकाने बाईकला जोरदार धडक दिली,
“स्टंटसाठी जीवाशी खेळ! ट्रॅक्टर चालकाचा धोकादायक स्टंट, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू”

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे स्टंट करत ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका व्यक्तीमुळे भयावह अपघात घडला. स्टंट करून ‘रील’ बनवण्यात व्यस्त असलेल्या ट्रॅक्टर चालकाने बाईकला जोरदार धडक दिली, ज्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.

17 वर्षीय ललित आणि त्याचा मित्र मुनेश झांझर गावात असलेल्या इंटर कॉलेजमधून परीक्षेचं हॉलतिकीट आणण्यासाठी बाईकवरून जात होते. मात्र, रस्त्यावर स्टंट करत असलेल्या ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या बाईकला धडक दिली.

रबूपुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी सुजित उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर चालक अत्यंत धोकादायकपणे स्टंट करत होता. त्यामुळे तो नियंत्रण गमावून ललित आणि मुनेशच्या बाईकला धडकल्याने भीषण अपघात झाला.ललितचा जागीच मृत्यू झाला, तर मुनेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलंदशहर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version