अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या दिवशीच बँकांनी पुकारला संप

अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या दिवशीच बँकांनी पुकारला संप

देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. दरम्यान देशातील सर्व बँकानी यादिवशीच संप पुकारला आहे. बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आणि शनिवारी संपावर जाणार असल्याचे सांगितले आहे.

बँक कर्मचारी संघटनांची मध्यवर्ती संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यात वेतन सुधारणेच्या मागणीवर गुरुवारी उपाय न निघाल्याने संपाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

भारतीय स्टेट बँकेसह अन्य काही बँकांकडून आपापल्या ग्राहकांना या संपाविषयी गुरुवारी माहिती देण्यात आली आहे.

सलग दोन दिवस चालणाऱ्या या संपामुळे कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचे बँकांनी ग्राहकांना सांगितले आहे. शनिवारी अर्थसंकल्प जाहिर होणार असून त्या दिवशी सर्व सरकारी बँका संपावर असतील.

इंडियन बँक्स असोसिएशनसोबत गुरुवारी झालेली चर्चा अनिर्णित राहिल्याने संप पुकारावा लागला आहे. असे अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी. एच. वेंकटाचलमांनी स्पष्ट केले.

असोसिएशनच्या चुकीच्या धोरणाचा हा परिणाम असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. बँकांच्या युनायटेड फोरमने वेतन सुधारणेची प्रमुख मागणी आयबीएकडे केली होती. मात्र नोव्हेंबर २०१७ पासून ही मागणी प्रलंबित आहे.

यासंदर्भात १३ जानेवारी रोजी मुंबईत फोरमची बैठक झाली असून त्यामध्ये वेतन सुधारणेच्या बाबतीत तीव्र आंदोलन करण्याचे ठरवले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version