‘मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं’

‘मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं’

मुख्यमंत्री व्हायल आवडेल, अशी स्पष्टोक्ती विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. यावर, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला आहे. २०२४मध्ये भाजपा आणि शिवसेना युतीचाच मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्री होण्यासाठी राजकारणात संख्याबळ लागतं, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना लगावला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री होणे कोणाला आवडत नाही?, परंतु राजकारणात संख्याबळाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तरीही अजित पवार यांना शुभेच्छा. मात्र, २०२४च्या विधानसभा निडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीचे २००हून अधिक जागा निवडून येतील. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची कुणीही स्वप्न बघणे चुकीचे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

तसेच अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना मागील काही दिवसांत जोर आलेला आहे. यावर बावनकुळे यांनी भाष्य केलं. अजित पवार भाजपात येणार असल्याचा प्रस्ताव अद्याप भाजपाकडे आलेला नाही. तसेच मागील तीन महिन्यात अजित पवार मला भेटलेसुद्धा नाही. मविआचे नेते अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अजित पवार यांनी भाजपाशी कोणताही संपर्क केलेला नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version