यंदाची पंढरपूर वारी ठरणार आरोग्य वारी

यंदाची पंढरपूर वारी ठरणार आरोग्य वारी

यंदाची पंढरपूरची वारी आरोग्य वारी ठरणार असून महा आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी सज्ज आहेत. आरोग्य विभागाकडून सहा लाखांपेक्षा अधिक भाविकांना पुरण्या इतका औषध साठा तयार करण्यात आला आहे. एक्स-रे पासून सोनोग्राफी पर्यंत सर्व आरोग्य विभागाच्या तपासण्या एकाच ठिकाणी असणार आहेत. पंढरपूर शहरातील वाखरी, गोपाळपूर आणि ६५ एकर परिसरामध्ये यंदाच्या आषाढी वारीमध्ये २७, २८ आणि २९ जुलै रोजी तीन दिवस महाआरोग्य शिबिर होणार आहे. यासाठी सुमारे ३००० डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आरोग्य विभागाकडून तैनात करण्यात आले आहेत. तर सहा लाख भाविकांच्या तपासणीचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version