‘…हा भाजपचा डाव’ – मिटकरी

‘…हा भाजपचा डाव’ – मिटकरी

‘भगतसिंह कोश्यारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालाच्या पदावरून मोकळं होण्याची इच्छा ट्विटद्वारे व्यक्त केली असली तरीही हा भाजपचा डाव आहे’, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

‘राज्यपालांना जर राजीनामा द्यायचा असेल, तर भारतीय संविधानाच्या नियमानुसार त्यांनी राष्ट्रपतींशी पत्रव्यवहार करणे अपेक्षित आहे, नरेंद्र मोदींशी बोलण्यात काहीही अर्थ नाही, त्यांच्याविरोधात आंदोलने झाली तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता परंतु त्यांनी माफीही मागितली नाही इतके ते निगरगट्ट आहेत’, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

‘मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी भाजप रणनीती आखत असून राज्यपालांनी राजीनामा देणे हा सुद्धा भाजपचा मतपेटी राखण्यासाठीचा डाव आहे’, असेही वक्तव्य त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीशी बोलाताना केले.

‘आता उर्वरित वेळेत त्यांनी चिंतन करायचे आहे की आत्मक्लेश करायचा आहे हे महाराष्ट्राला त्यांनी सांगावं, तसेच नाक घासून माफी मागितल्याशिवाय कोश्यारींनी महाराष्ट्र सोडू नये, असेही मिटकरी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ‘पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात, आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करण्याची, इच्छा व्यक्त केली आहे.

भगत सिंह कोश्यारी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version