सना खान प्रकरणात उघड चौकशी व्हावी

सना खान प्रकरणात उघड चौकशी व्हावी

सना खान प्रकरणात उघड चौकशी व्हावी

मुंबई, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सना खान खून प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये भाजपचे अनेक बडे नेते सामील असल्याचे वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. आम्हाला सर्व माहिती मिळाली आहे. या सर्वांची नावे नक्कीच समोर येतील, असेही ते म्हणाले. गुरुवारी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील तेंदुखेडा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

त्यातच सना खान प्रकरणात काँग्रेस आमदारांची उघड चौकशी केली जाते.. मात्र भाजप आमदारांची लपून छपून चौकशी केली जाते असा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निष्पक्ष चौकशी केली जावी असे मत व्यक्त केले.भाजप काँग्रेस हा विषय नसून चौकशी निष्पक्ष व्हावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version