Eknath Shinde : काही तरी घडतंय! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीकडे रवाना

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 विधान परिषद जागासाठी निवडणूक होत आहे. 18 जून रोजी यासाठी मतदान होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Eknath Shinde : काही तरी घडतंय! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीकडे रवाना

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 विधान परिषद जागासाठी निवडणूक होत आहे. 18 जून रोजी यासाठी मतदान होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीत जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.

हेही वाचा- Devendra Fadnavis: ‘सीमेवर वर्षभर युद्ध चाललं तरी दारुगोळ्याची कमतरता भासणार नाही…’; शिर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या 7 जागेसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. दरम्यान 23 मे रोजी सकाळी नंदनवन इथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सोबत बैठक झाली होती. विश्वसनीय सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिक या जागेचा काढा कायम असल्याची माहिती आहे.

विशेष करून ठाण्याच्या जागेसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. भाजप आणि शिवसेना काही जागांवर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दिल्लीत पक्ष नेतृत्वाकडे विधान परिषदेच्या जागांचा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version