एसटी आंदोलन अडकलं चर्चेच्या घोळात

एसटी आंदोलन अडकलं चर्चेच्या घोळात

  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनी करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी अनेक चर्चा घेत आहे. महाविकास आघाडीचे पुढचे पाऊल हे महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानुसार घेणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

 महाधिवक्तासोबत चर्चा करून एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन अनिल परब यांनी संपकारी प्रतिनिधींना दिले आहे.

अनिल परबांना साडीचोळी आणि बांगडीचा आहेर

  मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संप पुकारला आहे. तसेच दुसरीकडे राज्य सरकारकडून यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहेत. संतप्त आंदोलकांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना साडीचोळी आणि बांगडीचा आहेर दिला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना भाजप नेते किरिट सोमय्या यांनी पाठिंबा दिला आहे.

  ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं, भैरोबाच्या नावानं चांगभलं’ अशा घोषणा आंदोलनादरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केल्या आहेत. तसेच आंदोलक कर्मचाऱ्यांनी राज्यसरकारच्या निषेधाच्याही घोषणा केल्या आहेत. या आंदोलनात महिला आंदोलकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कर्मचारी गंगाधर तुकाराम सानप यांच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे.

  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही एसटी आंदोलनाचा तिढा सुटावा यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच याप्रकरणी सरकारने चर्चेसाठी बोलवल्यास नक्की सहभागी होऊ असे देवेंद्र फडणवीस म्हटले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version