महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश केला आहे ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
‘महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर गुन्हा दाखल होऊन मी तुरुंगात गेलो पाहिजे म्हणून अनेकांनी खूप प्रयत्न केले आहेत’, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, ‘मला तुरुंगात टाकण्यासाठीचा आदेश वरून आला होता’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. ‘माझी सुपारी तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर संजय पांडे यांना देण्यात आली होती. पण, त्यांचा प्रयत्न असफल झाला’, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
मंगळवारी दिल्ली दौऱ्यावरून परतताना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.