‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार ‘हे’ सुपरस्टार्स!

‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार ‘हे’ सुपरस्टार्स!

1982 मध्ये रिलीज झालेला ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट त्या काळात खूप गाजला होता. अमिताभ बच्चन आणि त्याचे भाऊ यांची गोष्ट सांगणारा हा चित्रपट होता. आता पुन्हा एकदा या गोष्टीचे विनोदी रुपांतर आणि नविन कलाकारांसह बघायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान या चित्रपटाचे रिमेकचे दिग्दर्शन करणार असून रोहित शेट्टी या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटामध्ये अभिताभ आणि हेमामालिनी यांची भूमिका कोण साकारणार यांची काही दिवसापासून चर्चा रंगत होती. मात्र आता या गोष्टीचा शोध संपला आहे.

‘सत्ते पे सत्ता’ च्या रिमेकची प्रेक्षकांना उत्सुकता

‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाच्या रिमेकसाठी दीपिका पादुकोन , कॅटरीना कैफ यांची नावे चर्चेत होती.

मात्र आता हेमामालिनीच्या भूमिकेसाठी अनुष्का शर्माचे नाव पक्कं करण्यात आलंय. झाले  असून अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेमध्ये ह्रतिक रोशन दिसणार आहे.

2020 मध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु होईल आणि 2021 च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अद्याप या सिनेमाचं नाव ठरलेलं नाही. मात्र त्यावर काम सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version