महानगरी मुंबईमध्ये बाळमृत्यूची संख्या सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 2018-19 या वर्षांमध्ये 1 हजार 402 नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर बाळमृत्यूचा दर घटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यातच राज्यातही 13 हजार 70 नवजात शिशुंच्या मृत्यूची नोदं सरकार दरबारी आहे.
आमदार आशिष शेलार, मंगेश कुडाळकर आणि अन्य आमदारांनी यासंदर्भात विधानभवनात तारांकित प्रश्न केला.
या प्रश्नाला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिलं. या दिलेल्या उत्तरात ही आकडेवारी समोर आली आहे.
आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एचएमआयएस चा हा अहवाल आहे.
या अहवालानुसार महाराष्ट्रात 2018-19 या वर्षात 2 लाख 11 हजार 772 नवजात शिशुंचे वजन हे जन्मत: अडीच किलोपेक्षा कमी असल्याचं समोर आलं.
तर एकट्या बृहनमुंबईत सर्वाधिक कमी वजनाच्या मुलांचा जन्म झाला आहे. मुंबईत एकूण 21 हजार 179 नवजात मुलांचं जन्मली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.