संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे रिगंण सोहळा असतो. बेलवाडी या ठिकाणी हा रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रथम रिगंण सोहळ्यात महिला तुलसी घेऊन महिलांनी प्रदिक्षणा पूर्ण केल्यात्यानंतर विणेकरी, पताका धारक वारकरी, यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर मानाच्या अश्वाने संत तुकाराम महाराज्यांच्या पादुकांना तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी सकाळी सणसर येथून प्रस्थान केले. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिलं गोल रिंगण बेलवंडी या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यानंतर पालखी दुपारच्या विसाव्याला लासुर्णे या ठिकाणी थांबून. संध्याकाळी आंथुर्णै या ठिकाणी पालखीचा मुक्काम होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.