महाराष्ट्रासह देशभरात जागतिक योगदिनाचा उत्साह

महाराष्ट्रासह देशभरात जागतिक योगदिनाचा उत्साह

आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिली आहे. चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असलेला योगाचे महत्त्व कळण्यासाठी आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.

चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असलेला योगाचे महत्त्व कळण्यासाठी आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. भारताकडून जगाला योगाचे महत्त्व कळाले आहे. त्यामुळे भारतात महाराष्ट्रासह विविध राज्यात योगदिन साजरा करण्यात येत आहे. यामध्ये राजकीय नेते, सेलिब्रिटी व योगप्रेमींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

भारताकडून जगाला योगाचे महत्त्व कळाले आहे. त्यामुळे भारतात महाराष्ट्रासह विविध राज्यात योगदिन साजरा करण्यात येत आहे. यामध्ये राजकीय नेते, सेलिब्रिटी व योगप्रेमींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार २१ जूनला हा दिवस साजरा केला जातो. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version