९६व्या ऑस्करची तारीख जाहीर

९६व्या ऑस्करची तारीख जाहीर

मुंबई, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : गेल्या महिन्यात लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटर्समध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यानंतर नुकतेच ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस’ने 96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर केली आहे. 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पुढील वर्षी 10 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’ने आपल्या अधिकृत समाज माध्यमांच्या आधारे हि माहिती दिली आहे. इंस्टग्रामवर एक खास पोस्ट सामाईक करत त्यांनी हि माहिती दिली तर या पोस्ट खाली ,’ ‘सेव्ह द डेट! 96 वा ऑस्कर सोहळा रविवार, 10 मार्च 2024 रोजी होणार आहे.’ असे लिहिले होते.

अकादमीने ऑस्करसाठी सर्वसाधारण श्रेणीतील सादरीकरणासाठी 18 नोव्हेंबर 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. तर प्रवेशिका निवडल्यानंतर 18 डिसेंबरपासून पुरस्कारासाठी मतदान सुरू होईल. त्यानंतर त्याचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होईल. महत्त्वाची बाब म्हणजे नामांकन श्रेणीसाठी मतदान करण्याची वेळ 11 ते 16 जानेवारी 2024 दरम्यान असेल. त्यानंतर अधिकृत नामांकने 23 जानेवारीपासून सुरू होतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version