कोरोना मृतांच्या यादीत चक्क २१६ जिवंत लोकांची नावे

कोरोना मृतांच्या यादीत चक्क २१६ जिवंत लोकांची नावे

कोरोना संकट टाळात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. मात्र बीडमधील अंबाजोगाई शहरातील कोरोना मृतांच्या यादीत चक्क २१६ जिवंत लोकांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे याप्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

कोरोनाकाळात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या नावांची खातरजमा प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. मात्र मृतांच्या नावांची खातरजमा सुरू असताना बीडमधील अंबाजोगाई शहरातील चक्क २१६ जिवंत माणसाची नावे कोरोना मृतांच्या यादीत आली आहेत.

अंबाजोगाई शहरातील तहसीलदारांकडे ५३२ व्यक्तींच्या नावाची यादी तयार करण्यात आली. त्यांच्या नावांची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या घरांची चौकशी करण्यात आली. आणि या चौकशीमध्य़े ५३२ नावांच्या यादींपैकी ३१६ मृत व्यक्तींच्या नावांची नोंद आहे. त्यामुळे आता २१६ इतकी वाढीव नावे कुठून आली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version