BMC Corporator : AIMIM च्या आणखी एका नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द, मुंबई महापालिकेत सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला

BMC Corporator :  AIMIM च्या आणखी एका नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द, मुंबई महापालिकेत सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) प्रभाग क्रमांक 138 (मानखुर्द-शिवाजीनगर) मधील एमआयएम (AIMIM) पक्षाच्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. ओबीसी (जुलाह) प्रवर्गातून आरक्षित असलेल्या या जागेवरील त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. या कारवाईमुळे त्यांचे पद रद्द करण्यात आले असून, एमआयएमने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा : Central Railway Line : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेवर परिणाम, लोणावळा – कर्जत मार्गावर भूस्खलनामुळे या कालावधीसाठी रेल्वेगाड्या रद्द

परिणामी, याचा फायदा भाजपला होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपमध्ये आणखी एक नगरसेवक वाढून त्यांचे संख्याबळ वाढणार असल्याचे समजते. प्रभाग 138 मधील AIMIM चे नगरसेवक रोशन शेख यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने नगरसेवकपद गेले. या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही दोन अपात्रतेच्या प्रकरणांत दुसऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. एकूण अपात्र तीन नगरसेवक, पैकी एक ठाकरेंची शिवसेना आणि दोन MIM चे नगरसेवक बाद झाले आहेत. दरम्यान, आज, शुक्रवारी सभागृहात तिसऱ्या नगरसेवकाच्या अपात्रतेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version