तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या टीव्हीके पक्षाचा सर्वेसर्वा विजय थलपतिच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याच्या मनसुब्यांना तुर्तास ब्रेक लागला आहे. सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यापूर्वी पक्षाने पाठिंब्याबाबत पुरावे द्यावेत, असे राज्यपालांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळे शपथविधी लांबणीवर पडला आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणूकीत 234 जागांपैकी TVKला 108 जागा मिळाल्या. काँग्रेसने बुधवारी ‘टीव्हीके’ला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ 113 पर्यंत पोहचले.आता कॉंग्रेसच्या पाठिंब्यानंतरही पाच सदस्यांची गरज आहे. यासाठी आता गुरूवारी VCK पाठिंबा जाहीर करेल. अशी अपेक्षा आहे. अजूनही तीन सदस्य बहुमतासाठी कमी पडत असून, डाव्या पक्षांशी संपर्क साधला जात आहे. काँग्रेस नेतृत्त्वही स्थिर सरकारसाठी या पक्षाच्या प्रमुखांच्या संपर्कात असल्याचे समजते.
तमिळनाडूतील या घडामोडींनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) गोटातून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत ‘अण्णा द्रमुक’चे 47 सदस्य तसेच अंबुमणी रामदास यांच्या ‘पीएमके’चे चार सदस्य आहेत. याखेरीज टी. व्ही. दिनकरन यांच्या पक्षाचा एक सदस्य आहे.
टीव्हीके-108
द्रमुक- 59
अण्णाद्रमुक- 47
काँग्रेस- 5
इतर-08
एकूण जागा-234
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.