सध्या तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. आज म्हणजेच शनिवारी 9 मे 2026 रोजी थलापती विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त समोर आले. मात्र आता यामध्येही मोठा पेच निर्माण झाला आहे. सुपरस्टार थलापती विजय यांच्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमतापासून केवळ एका जागेची कमतरता होती आणि चेन्नईच्या राजकीय वर्तुळात विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची जोरदार चर्चा सुरू होती.
मात्र अशातच आता नविन अपडेट समोर आली आहे. राज्यपालांना अजूनही दोन पक्षांची समर्थनपत्रे मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप शपथविधीची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (AMMK) चे प्रमुख टी.टी.व्ही. दिनकरन यांनी तामिळनाडूतील राजकारणाची सर्व सूत्र फिरवली आहेत. दिनाकरन यांनी थेट राजभवनाला पाठिंबा पत्र पाठवत एडप्पाडी के. पलानीस्वामी (EPS) यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
काय म्हणाले दिनाकरन?
एएमएमकेचे महासचिव टी.टी.व्ही. दिनकरन यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, “मी एआयएडीएमकेला पाठिंबा देत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी एडप्पाडी पलानीस्वामी यांच्या समर्थनार्थ मी हे पत्र सादर केले आहे. आमचे आमदार कामराज यांनीही त्यावर सही करून माझ्या सचिवामार्फत ते पाठवले. जेव्हा मी टीव्हीके (TVK) पाहिले, तेव्हा मला धक्का बसला, कारण त्यात आणखी एक पत्र होते, कदाचित ते बनावट असावे, किंवा हा घोडेबाजाराचा प्रकारही असू शकतो. मी माझ्या आमदारांना फोन केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास या पत्रावर सही करून ते येथे पाठवले. जेव्हा मी टीव्हीवर पाहिले की आमच्या पक्षाने विजयला पाठिंबा दिला आहे, तेव्हा मला धक्का बसला”.
पुढे ते म्हणाले की, “त्यामुळे, मी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आणि त्यांना ते पत्र देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. माझा विश्वास आहे की हे पत्र बनावट आहे किंवा घोडेबाजाराचे प्रकरण आहे. त्यांनी हे घडू देऊ नये”, असं ते म्हणाले.
#WATCH | AMMK general secretary T.T.V. Dhinakaran says, "It is a case of horse trading or forgery. It is a mockery of democracy. How can he support Opposition MLA? How can he (Vijay) say I am clean? How can he give good governance, a clean governance? He is getting support from… pic.twitter.com/L3fUJvVC2I — ANI (@ANI) May 8, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.