मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत आज चार महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत आले. सेव्हनहिल्स रुग्णालयाचे PPP मॉडेलद्वारे खासगीकरण, 5 उपनगरी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे PPP प्रस्ताव, वांद्रे रेक्लेमेशनमधील Exhibition Centre आणि मालबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान यासर्व प्रस्तावांवर आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता. काही प्रस्तावांवर चर्चेविनाच ब्रेक लावण्यात आला असून अध्यक्षांकडून प्रस्ताव प्रशासनाकडे पुन्हा फेरविचारासाठी पाठवण्यात आला. यावेळी रक्तपेढी प्रस्तावावर तर खुद्द शिंदे गटाच्या नगरसेवकाकडूनही फेरविचाराची सूचना करत आदित्य ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला. मात्र ज्या आवाहन केलेल्या भाजपने प्रतिसाद नाकारल्याची चर्चा आहे. यावर स्वत: मिलिंद नार्वेकर काय म्हणाले ते जाणून घेऊयात….
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.