टीईटी परीक्षा घोटाळा : सौरभ त्रिपाठीला लखनऊमधून अटक

टीईटी परीक्षा घोटाळा : सौरभ त्रिपाठीला लखनऊमधून अटक

यंदाची टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपवण्यात आली होती. मात्र यावर्षी झालेली टीईटी परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रमुख सौरभ त्रिपाठीला लखनऊमधून अटक करण्यात आली आहे.

दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सौरभ त्रिपाठीला पुणे पोलिसांनी लखनऊमधून अटक केली आहे. सौरभ त्रिपाठीने २०१७साली जी टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेचे परिक्षा घेण्याचे कंत्राट मिळवून देण्यात लाजझनींगचे काम केले होते. त्यानंतर शिक्षण परिषदेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्याने स्वतःची विनर सॉफ्टवेअर नावाची कंपनी सुरु केली. सौरभ त्रिपाठी हा न्यासा कंपनीला परिक्षा घेण्याचे कंत्राट मिळवून देण्यात ही सहभागी होता. न्यासा कंपनीकडे आरोग्य भरतीची परिक्षा घेण्याचे कंत्राट आहे. त्यामुळे आता टीईटी प्रकरणाची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला असून मंगळवारी आणखी दोघांना अटक केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्विन कुमार यांना पोलिसांनी अटक केली. सुखदेव डेरे हे टीईटी परिक्षेच्या वेळी नियंत्रक होते तर जी.ए. टेक्नॉलॉजीकडे या परिक्षेचे कंत्राट होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version