दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात

दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात

राज्यात आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाली आहे, तर आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे.

१६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. तसेच दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटं तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटं वाढवून देण्यात आला आहे.

काय आहेत नियम?

विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर परीक्षा वेळेच्या किमान १ तास आधी जावे लागेल.


विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर सोबत ठेवणे अनिवार्य आहे.


परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तापमान तपासणी करण्यात येईल.


विद्यार्थ्यांना कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत ठेवता येणार नाही.


विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिक आणि उत्तरपत्रिक अचूक वाचून घ्यावी.


जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version