साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ म्हणून ओळख असलेल्या वणी सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. येत्या २१ जुलै ते ५ सप्टेंबर पर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे.मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याचे काम करण्यासाठी हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात भाविकांना पहिल्या पायरीच दर्शन घेता येणार आहे.त्यानुसार २१ जुलैपासून ०५ सप्टेंबरपर्यंत भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वणी येथील गडावरील सप्तशृंगी मातेचे मंदिर बंद राहणार आहे. दरम्यानच्या काळात भाविकांना पहिल्या पायरीच दर्शन घेता येणार आहे.
याआधीही कोरोनामुळे भाविकांना सप्तशृंगीदेवीच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. मात्र कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करत आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण होते.साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचे स्थान असलेली सप्तशृंगी देवी ही अनेकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे गडावर उत्तर महाराष्ट्र आणि राज्याच्या इतर भागातूनही भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात, यावेळी मात्र या भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार नाही ४५ दिवस मंदिर दुरुस्ती साठी आणि इतर कामकाजासाठी मंदिर बंद राहणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.