T 20 वर्ल्ड कप 2020 च्या फायनल्समध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाच्या संघाने पराभव केला आहे. भारतीय संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलियन संघाने पाचव्यांदा विश्वचषक पटकावलाय. भारताला 85 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.
ऑस्ट्रेलिये नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी घेतली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंनी आक्रमक बॅटिंग केली. ऑस्ट्रेलियन ओपनर एलिसा हिलीने सर्वांत जलद हाफ सेंच्युरी झळकवण्याचा रेकॉर्ड केला. तिने केलेला 39 चेंडूंत 75 धावा काढण्याचा विक्रम अद्याप कुणी करू शकलेलं नव्हतं. बेथ मुनीनेही आक्रमक खेळ केला.
भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचं आव्हान पेलता आलं नाही. भारतीय ओपनर शफाली वर्मा ही 2 रन्सवर बाद झाली. त्यानंतर भारतीय महिला फलंदाज एकामागेमाग बाद होत गेले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर 85 धावांनी विजय मिळवला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.