Uddhav Thackeray : "…तर फडणवीसांनी अजित पवारांची जाहीरपणे माफी मागावी" अजित पवारांवर भाजपने केलेल्या ‘त्या’ आरोपावरून उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दादर येथील शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले.
Uddhav Thackeray : "…तर फडणवीसांनी अजित पवारांची जाहीरपणे माफी मागावी" अजित पवारांवर भाजपने केलेल्या ‘त्या’ आरोपावरून उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर दादर येथील प्रसिद्ध शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची ऐतिहासिक जाहीर सभा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली. खास गोष्ट म्हणजे, या सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 20 वर्षांच्या अंतरानंतर एकत्र येऊन मंचावर आपली उपस्थिती दाखवली, ज्यामुळे या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करत म्हणाले की, "तुम्ही तुमच्या राज्यातील एक शहर दाखवा जो भाजप शासित शहर आहे जो मुंबईच्या बरोबरीने येऊ शकेल, तुम्ही असं एक शहर दाखवा मी काहीही हरायला तयार आहे. पण मुद्दे सोडून बोलायचं आपल्याला आपापसात भांडवत ठेवायच आणि अदानीच्या थैल्या भरायच्या. राजने तुषार आपटेचाच उल्लेख केला. अक्षय शिंदेला मारलं त्याचा एनकाउंटर केला. मी याच व्यासपीठावरून म्हणालो होतो की, शिंदेंना गोळ्या घालायलाच हव्या होत्या. याचा संदर्भ काही जणांनी वेगळ्या अर्थाने घेतला. माझं म्हणण एवढचं होत की, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. पण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एनकाउंटर केला तो आता तुम्हाला संशयास्पद वाटत नाही का? कारण जर अक्षय शिंदे जिवंत असता आणि त्याने सहआरोपी असलेल्या तुषार आपटेची माहिती दिली असती तर फासावर कोण गेला असता? पण हे पुरावे मारुन टाकायचे". 

हेही वाचा- Thane Election 2026: ठाणे कोणाचं? शिंदेंच्या होम ग्राऊंडवर ठाकरे बंधूची संयुक्त सभा; एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली
"तुषार आपटेने बदलापुरमध्ये पक्षाचं काम चांगलं केल म्हणून त्या विकृताला तिथला स्विकृत नगरसेवक केलं. आम्हाला भाजप काही काळ आपला वाटत होता, जो राष्ट्र प्रथम म्हणत होता. आता ज्याप्रमाणे त्यांच्यात गुंड जातायत, आणि अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट मत आहे देवेंद्र फडणवीसांना की, 70 हजार कोटीच्या घोटाळ्यांचे आरोप तुम्ही आणि मोदींनी त्यांच्यावर केले. ढिगभर पुरावे तुम्ही दिले. आता जर ते साधू आहेत असं तुम्ही म्हणताय, तर पुरावे तुम्ही दिले. ते आता कोर्टाने पूरावे की जाळावे एवढ सांगा. आणि जर त्या पुराव्यात दम असेल तर तुम्हाला माहिती ते तुम्ही दिले आहेत. तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या आणि जर दम नसेल, तर अजित पवारांची जाहीरपणे माफी मागा. माखलेले लोक सोबत घ्यायचे आणि निष्ठांवयांनी त्यांचे लंगोट धुवायचं हे भाजपात सुरू आहे. जेव्हा संकटात मुंबईकर असतो तेव्हा शिवसैनिक तिथे उभा असतो". 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version