मणिपूर हिंसाचाराविरोधात ताई गट आक्रमक

मणिपूर हिंसाचाराविरोधात ताई गट आक्रमक

मणिपुरमध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रावादीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी हे आंदोलन पुकारलं होत. मोठ्याने घोषणाबाजीदेखील करण्यात आली. अटक झालेल्या दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

मणिपूर येथे महिलेवर झालेल्या हिंसा व अत्याचाराविरोधात आज नागपूरच्या वेरायटी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा नेतृत्व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं. ४ मे रोजी मणिपुरात दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. यापैकी एक महिला कारगिल युद्घात लढलेल्या सैनिकाची पत्नी आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्यामुळे या प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version