‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीचा निर्मात्यांवर आरोप

‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीचा निर्मात्यांवर आरोप

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेल्या दशकापासून प्रेक्षकांचे भरगोस मनोरंजन करत आहे. दरम्यान अलीकडच्या काळात बरेच कलाकार मालिका सोडून गेल्याने ही मालिका बरीच चर्चेत होती. दरम्यान आता अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने टतारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असितुकमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहैल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्याविरोधात कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत तिने मुलाखतीत खुलासा केला आहे

जेनिफर म्हणाली,”असित मोदींनी 2019 पासून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. आम्ही शूटिंगसाठी सिंगापूरला गेलो होतो. तेव्हापासून असित माझ्यासोबत गैरवर्तन करत होते. सिंगापूरमध्ये असताना अनेकवेळा त्यांनी मला हॉटेलच्या खोलीत बोलावले होते.”असे तिने सांगितले. तिचे हे वक्तव्य ऐकून सध्या बऱ्याच चजरचा होऊ लागल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version