‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार – संभाजीराजे

‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार – संभाजीराजे

खासदार संभाजीराजे यांच्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, पुण्यात पत्रकार परिषद घेत संभाजीराजे यांनी अनेक निर्णय जाहीर जाहीर केले आहेत. राज्यसभेसाठी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच त्यांनी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याचेही सांगितले आहे.

संभाजीराजे म्हणाले, ‘जनसेवा करायची असेल तर राजसत्तादेखील महत्त्वाची आहे. जुलैमध्ये राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होणार आहेत. मी शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असून अपक्षांनी मला पाठिंबा द्यावा’, असे ते म्हणाले. तसेच राज्यातील जनतेच्या कामासाठी भाजपाने मला खासदारकी दिली. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.

‘महाराष्ट्राच्या जनतेने आजवर खूप प्रेम केलं. सत्तेत राहून मी अनेक कामं केली आहेत. समाजहिताची कामं केली आहेत. त्यामुळे मला पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे. तसेच मी आजपासून कुठल्याही पक्षात जात नसून अपक्ष निवडणुक लढवणार असल्याचेही संभाजीराजे यांनी जाहीर केले आहे.

तसेच, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी, गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी मी स्वराज्य संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणाही संभाजीराजे यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version