राज्यसभेतील गोंधळाप्रकरणी १२ खासदारांचे निलंबन

राज्यसभेतील गोंधळाप्रकरणी १२ खासदारांचे निलंबन

संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यासभेतील गोंधळाप्रकरणी १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसनेचे अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे.

निलंबित खासदार

एल्लामारम करीम (सीपीएम), फुलो देव निताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपून बोरा (काँग्रेस), बिनोय विश्वम (सीपीआय), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस), शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस), सय्यद नसीर हुसैन (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना), अखिलेश प्रसाद सिंह (काँग्रेस)

संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी एकूण १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात या निलंबित खासदारांना सहभागी होता येणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version