Ashok Kharat Nashik Case : केसरकर, चाकणकर यासारख्या लोकांनी खरातला पोसलं, यांचे आर्थिक सोर्स काय?

कॅप्टन अशोक खरातप्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
Ashok Kharat Nashik Case : केसरकर, चाकणकर यासारख्या लोकांनी खरातला पोसलं, यांचे आर्थिक सोर्स काय?

नाशिक : कॅप्टन अशोक खरातप्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं राज्य महिला आयोग अध्यक्षपदही यामुळे गेलं आहे. खरातची पाळमूळ किती खोल आहेत, याचा शोध आता पोलिसांसोबतच अनेक राजकीय क्षेत्रातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या घेत आहे. याचदरम्यान, आज शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी नाशिक येथे जाऊन खरातप्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर सुषमार अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले. अमित शाहांपासून दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे कनेक्शन, फोटो माध्यमांसमोर सादर केली. शिवाय बॉलीवूडमधील संगीतकार अनु मलिक यांच्याबाबतही मोठा गौप्यस्फोक सुषमा अंधारे यांनी यावेळी केला. 

हेही वाचा : Narhari Zirwal calls Devendra Fadnavis : ‘त्या’ व्हिडिओवरून राजकारण तापले! झिरवळांचा थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना फोन; काय झाली चर्चा

काय म्हणाल्या सुषमा अंधारे 

सुषमा अंधारे यांनी सांगितले की, त्यांनी SIT प्रमुखांची भेट घेतली. तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचीही भेट घेतली. पोलिसांनी SIT कडे सगळा तपास वर्ग केला आहे. म्हणून पोलीस आयुक्त जास्त बोलू शकले नाही. SIT प्रमुखांनी दिलेली माहिती यावर भाष्य करणार नाही. महिलांच्या संदर्भात विषय असल्यानं बोलणं योग्य नाही, असे अंधारे म्हणाल्या. ठाकरे सरकारच्या काळात खरातला पाणी दिले, असा आरोप करणाऱ्यांना सुषमा अंधारे यांनी सडोतोड उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, तो ग्रामसभेचा ठराव होता म्हणून पाणी द्यायचा विषय होता याला शिफारस अर्थात चाकणकरांनी केलं. कैद्याला तहान लागली तर त्याला पाणी दिले जाते, त्यात जेलर कसा दोषी. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते. मुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय येत नाही. पाण्याची पाईपलाईन शिवनिका गेली कशी. तर जयकुमार रावल यांनी काय दिलं. ते कुणाच्या अंगा खांद्यावर खेळत आहे. बोलघेवडे लोकं का बोलत नाही. बंदूक परवाना कुणी दिला ? 2012 ला कोण होतं, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version