Sunil Tatkare Meets Sharad Pawar: मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

त्यांच्यामध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं  चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे. 
Sunil Tatkare Meets Sharad Pawar:  मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे.  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे अचानक शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्यामध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं  चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे. 

दरम्याने त्यानंतर तटकरे बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “शरद पवार साहेबांची तब्येत गेली काही दिवस ठिक नव्हती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नाही, कोणतंही राजकारण नाही”. असंही तटकरे म्हणाले. 

  मात्र या भेटीवरून आता राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  कारण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तटकरेंचं नाव नाही, आणि त्यानंतर लगेचच तटकरे शरद पवारांची भेट घेतात, यावरून आता चर्चा सुरू आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version