सुनील प्रभूंची प्रतोद पदावरून शिंदे गटाकडून उचलबांगडी

सुनील प्रभूंची प्रतोद पदावरून शिंदे गटाकडून उचलबांगडी

बंडखोर आमदारांना शिवसेनेने शेवटचा इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शिवसेना पक्षाच्यावतीने पत्र पाठवण्यात आले आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद (व्हीप) सुनील प्रभु यांनी हे पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवलं आहे. सायंकाळी पाच वाजता आमदारांनी मुंबईत या, अन्यथा आमदारांवर कारवाई होणार असल्याचे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

अशातच, दुसरीकडे शिवसेनेच्या सुनील प्रभूंची प्रतोद पदावरून शिंदे गटाकडून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभू यांनी काढलेल्या आदेशांना काही अर्थ नसल्याचे समोर आले आहे. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्या विधिमंडळ प्रतोदची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना विधिमंडळ प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, ‘शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.’

काय होते सुनील प्रभूंचे आदेश?

शिवसेना आमदारांच्या विधिमंडळ बैठकीला उपस्थित रहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना शिवसेना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. तसेच बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version