कर्करोगाच्या रुग्णांसाठी सुनिधीचे योगदान

कर्करोगाच्या रुग्णांसाठी सुनिधीचे योगदान

मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. सध्या सुनिधीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

गायिका सुनिधी चौहान हिने सामाजिक कार्यात देखील आपले योगदान दिले आहे. येत्या २१ मे रोजी ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’च्या निमित्ताने कर्करोग रुग्ण मदत संघटना (कॅन्सर पेशंट एड असोसिएशन) आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुनिधी लाईव्ह म्युझिक फॉर अ कॉज’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सुनिधी यांच्या या संगीत कार्यक्रमातून कर्करोगाच्या रुग्णांसाठी निधी संकलन केले जाणार आहे.

सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती घडवून आणणे आणि ज्यांनी आपला आवाज गमावला आहे, अशा कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी निधी संकलन करणे ही उद्दिष्टे साधली जाणार आहेत. २१ मे रोजी सायंकाळी ७ वाजता वांद्रे येथील रंगशारदा येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. ही बातमी कळताच सुनिधीचे चाहते तीचे कौतुक करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version