Sunetra Pawar : फडणवीसांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत घेणार अमित शाहांची घेणार भेट, विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौराही त्याच अनुषंगाने असल्याची माहिती समोर येत आहे.
Sunetra Pawar : फडणवीसांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  दिल्लीत घेणार अमित शाहांची घेणार भेट, विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात काल जिल्हापरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अचानक दिल्ली गाठल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौराही त्याच अनुषंगाने असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. आज सायंकाळी 6.45 सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आलं आहे. 

हेही वाचा – ST News : प्रवाशांची गैरसोय होणार? एसटी कर्मचारी संघटनेचा 12 फेब्रुवारी रोजीपासून राज्यभरात निदर्शनाचा इशारा 

मुंबईतील कामं उरकल्यानंतर आजच सुनेत्रा पवार दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राहणार आहेत. यानंतर उद्या त्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

हेही वाचा – Devendra Fadnavis: विजयाचा गुलाल उधळताच फडणवीस तडकाफडकी दिल्लीला रवाना; अमित शाह यांच्या भेटीत 'या' मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब? 

या भेटीत सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल चर्चा करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? की दोन्ही गटाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून एनडीएला पाठिंबा देणार? याबाबत चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवार दिल्लीला गेल्याची माहिती आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version