सध्या राज्यात ऑपरेशन टायगरने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत. यानंतर आता राज्यातील सर्व पक्ष अलर्ट झाले आहेत. ऑपरेशन टायगर पार पडण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अखेर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी बंड पुकारत आपला वेगळा गट स्थापन केला असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला अधिकृत मंजुरीही दिली आहे. सध्या शिवसेनेच्या सर्व 6 खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतून बाहेर हलवल्याची सुत्रांची माहीती आहे.
ठाकरे गटातील बंडखोरीची घटना ताजी असताना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांचा देखील पक्ष फुटणार का? यावर देखील चर्चा सुरू झाली आहे. तसेच सुनेत्रा पवार अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे चर्चना उधाण आले आहे.
शरद पवारांकडून फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या खासदारांना थेट इशारा
तर दुसरीकडे कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा असा इशारा शिवसेना, राष्ट्रवादी शरद आणि काँग्रेस या पक्षांकडून देण्यात आला आहे. यासंबंधी शरद पवारांनी काल संजय राऊत यांना कॉल करून त्यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी ते म्हणाले की, आता फुटीर खासदारांना सोडायचं नाही. मतदारसंघात जाऊन राडे करायचे. त्यासाठी मी स्वत: सभा घ्यायला तयार आहे. फक्त शिवसेना ठाकरे गटच नाही तर बेईनामी करणाऱ्या खासदारांना सोडणार नसल्याचे फोनवर शरद पवार यांनीही म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीवर आता शरद पवारांची राष्ट्रवादी देखील अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे आता फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या खासदारांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
ठाकरे गटातील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब
आज 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संसदेच्या कार्यालयात पक्षाची बैठक बोलावली होती. कालच त्यासाठी सर्व खासदारांना व्हिप बजावण्यात आला होता. आज बैठक सुरू झाली तेव्हा संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे असे राज्यसभेतील एक आणि लोकसभेतील तीन खासदार या बैठकीला उपस्थित होते. तर फुटलेल्या 6 खासदारांपैकी एकानेही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे आता या खासदारांविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. तर ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याचे शिक्कामोर्तंब झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.