दहावीच्या विद्यार्थिनीची परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थिनीची परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची आत्महत्या

भिवंडी शहरातील नागाव सलामतपुरा परिसरात असलेल्या अन्सारी साफिया गर्ल्स ऊर्दु हायस्कूल मध्ये दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने चाचणी परीक्षा संपल्यानंतर आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षेनंतर तिने शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती 14 वर्षांची होती. मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच रस्त्यात तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

भिवंडी शहरातील फातमा नगर येथे राहणारी मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख ही अन्सारी साफिया गर्ल्स ऊर्दु हायस्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती.

शाळेत सध्या चाचणी परीक्षा सुरू असून आज इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा पेपर होता.

सकाळी साडेसात वाजता मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख शाळेत आली आणि पहिल्या मजल्यावरील वर्गात परीक्षेसाठी बसली.

साडे नऊ वाजता पेपर सुटल्यावर मुबशीरा पहिल्या मजल्यावरुन शाळेच्या पाचव्या मजल्यावर गेली.

तेथील गॅलरीतून तीने दहाच्या सुमारास थेट खाली उडी मारुन आत्महत्या केली.

या मुलीची आत्महत्या करतानाची घटना शाळेच्या आवारातील CCTV त कैद झाली.

शाळा व्यवस्थापनाकडून मुलीने आत्महत्या का केली, याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

चाचणी परीक्षेचं दडपण नसून तिने नक्की कोणत्या दडपणाखाली हे टोकाचं पाऊल उचललंय, हे पालकांशी बोलल्यावरच स्पष्ट होईल असे उत्तर देण्यात आलंय.

घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शाळेचे रजिष्टार अकिल शेख यांनी दु:ख व्यक्त केलंय. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक शांतीनगर पोलीस स्टेशन येथे उशीरा मिळाल्याने त्यांनी घटनास्थळाला भेट देत या बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version