एसटी महामंडळाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

एसटी महामंडळाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

एसटी महामंडळाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

कराड, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : कराड पाटण मार्गावर सुपने गावाजवळ शेकडो विद्यार्थ्यांनी एसटी बस रोखून धरली होती. या गावातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्या – येण्यासाठी बसचा पर्याय घ्यावा लागतो. शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पास असल्याने त्यांना टॅक्सी किंवा इतर पर्याय न परवडणारा असतो . त्यामुळे बस हा एकाच पर्याय त्यांना उपलब्ध असतो. पण एसटीकडून बस वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

कराड पाटण मार्गावर सुपने या गावाजवळ सकाळी सात वाजता स्वतंत्र एसटी बस मिळावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. मात्र एसटी महामंडळ याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांसह गावातील ग्रामपंचायतीने देखील एसटी महामंडळाला निवेदन दिले आहे. पण या निवेदनाकडेही एसटी महामंडळाने दुर्लक्ष केले. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी बस देत नसल्याचा निषेध म्हणून आंदोलन केले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version