मावळ तालुक्यातील वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीत मंगळवारी दुपारच्या सुमारास नदीत बुडून एका तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यात धूलिवंदन सणाला गालबोट लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, जयदीप पुरुषोत्तम पाटील असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो आंबी येथील डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता.
जयदीप आणि त्याचे सहा-सात मित्र धुलिवंदन खेळून झाल्यावर इंद्रायणी नदीत हातपाय धुण्यासाठी गेले होते. तेव्हा जयदीप पाटील पाय घसरुन नदीत पडला आणि खोल पाण्यात बुडला. त्यच्या मित्रानी याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या सदस्यांना पाचारण करण्यात आली. तब्बल दोन तास बोटीच्या सहाय्याने शोध घेतल्यानंतर जयदीपचा मृतदेह हाताशी लागला.
पोलीस निरीक्षक रणजित सावंत, पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी यासंह पोलिस अधिकारी आणि वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचे प्रदिप गायकवाड, अनिश गराडे, गणेश गायकवाड, शुभम काकडे, रुत्विक तरू, विशाल जवेरी, गणेश सुंदेकर, अविनाश कारले, माली मामा, सत्यम सावंत, विनय सावंत, सुरज शिंदे, अनिल आंद्रे, निलेश गराडे, गणेश निसळ, गणेश ढोरे, वैभव वाघ यावेळी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.