एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, संपकऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई?

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, संपकऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई?

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मुंबईतील आझाद मैदानात ३९ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचा निर्णय घेतला. मात्र तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई होणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. त्याच संदर्भात आज बैठक पार पडणार असून या बैठकीत संपकारी कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई होणार का? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करूनही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कामावर पुन्हा न परतलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई केली जाणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. तसेच यावर बोलताना ते म्हणाले, सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई करण्याबाबत बैठकित निर्णय होऊ शकतो, असा इशारा मंत्री अनिल परब यांनी संपकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. दरम्यान संपकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. तरिही संपकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून अनेकांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. तसेच कामावर पुन्हा न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला होता. त्यामुळे काही कर्मचारी कामावर रुजू झाले तर काही कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत संपकारी कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई होणार का? याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version