मनाई आदेश जारी केल्यानंतरही एसटी कामगारांनी संप सुरूच ठेवला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने एसटी कामगारांचे नेते अजयकुमार गुजर यांना नोटीस बजावली आहे.
एसटी महामंडळ राज्य सरकारमद्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. संपाची शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने औद्योगिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र औद्योगिक न्यायालयाने कर्माचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली होती. न्यायालयाचा हा आदेश धुडकावून लावून कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. या संपादरम्यान राज्यातील ५९ एसटी आगारे बंद राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. एसटी कर्माचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे न्यायालयाने गुजर यांना नोटीस बजावली. याप्रकरणी उद्या दुपारी सुनावणी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.