नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर

नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर

नागरिक नववर्षाचे स्वागत नेहमी उत्साह आणि जल्लोषात करतात. मात्र सध्या राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा डोकं वर काढले आहे. त्यामुळे कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने नववर्षाच्या स्वागतासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. नववर्षाच्या जल्लोषासाठी अनेक नागरिक एकत्र येतात, गर्दी करतात त्यामुळे राज्य शासनाने रात्री ९ ते सकाळी ६पर्यंत नाईट कर्फ्यु लावला आहे. या संदर्भातील नियमावली राज्य शासनाने जाहीर केली  आहे. तसेच नववर्षाचे स्वागत साधेपणाने साजरे करून कोरोना नियमांचे पालन करत गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य शासनाने नागरिकांना केले आहे.

काय आहे नियमावली?

  • नव्या वर्षाच्या स्वागातील नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
  • राज्यात २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी.
  • सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
  • नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजिक करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहाच्या आसनक्षमतेच्या ५० टक्के पर्यंत असणार आहे.
  • खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहे.
  • नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
  • फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version